Header Ads

 • Breaking News

  भूमी अभिलेखची महिला लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात


  अहमदनगर । DNA Live24 - भूमि अभिलेख विभागातील लिपीक ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदीप नराल यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. जमीनीची मोजणी करण्याच्या मोबदल्यात त्यांनी ही रक्कम तक्रारदाराला मागितली होती.

  तक्रारदाराची नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ही जमीन त्यांच्या वडिलांच्या व चार चुलत्यांच्या नावावर होती. या जमिनीची आपसांत वाटणी झालेली असूनही जमिनीचे गट फोडलेले नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज करुन गटाची पाच हिश्शांमध्ये मोजणी करुन नकाशा मिळवला. या नकाशात मात्र मोजणी केल्याप्रमाणे पाच हिश्शांची निशाणी केलेली नव्हती.

  त्यामुळे तक्रारदाराने ज्योती डफळ यांची भेट घेऊन त्यांना नकाशात हिश्शांची निशाणी करुन देण्याची विनंती केली. त्यावर डफळ यांनी तक्राराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्याम पवरे, विष्णू आव्हाड, हेड कॉन्स्टेबल राजू सावंत, सुनिल पवार, एकनाथ आव्हाड, वाव्हळ, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, चालक अंबादास हुलगे यांच्या पथकाने सापळा रचून डफळ यांना रंगेहात लाच स्वीकारताना पकडले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad