Header Ads

 • Breaking News

  काेपर्डीत मराठा क्रांती आढावा मेळाव्याचे आयोजन

  कर्जत । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेला १३ जुलैला एक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १३ जुलैला कोपर्डीत श्रध्दांजली कार्यक्रम व सकल मराठा क्रांती आढावा मेळावा होणार आहे. तसेच ९ आॅगस्टला मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चाचे नियोजन केले जाईल. यासाठी देशातील व राज्यातील सर्व मराठा नेते व प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित केले आहे.

  कोपर्डी येथील भैरवनाथ मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजता बैठक झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर, अॅड कैलास शेवाळे, संजय तोरडमल, बाळासाहेब सांळुके, झुंबर सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक, तात्यासाहेब सुद्रिक, कृष्णा शेळके, शिवाजी सुद्रिक, हरी सुद्रिक, सुभाष सुद्रिक, बाबासाहेब सुद्रिक, मधूकर सुद्रिक, गणेश सुद्रिक, सुरेश सुद्रिक, नाना सुद्रिक, व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

  १३ जुलैला कोपर्डी येथे राज्यस्तरीय आढावा मेळावा घेण्याचे बैठकीत ठरले. कोपर्डी घटनेनंतर राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने निघालेल्या मुक मोर्चे व आंदोलनांचे मुल्यमापन केले जाईल. तसेच ९ आॅगस्टला राज्यभरातील सकल मराठा समाज मुंबईत मुक मोर्चा काढणार आहे. त्याचे नियोजनही केले जाणार आहे. आगामी आठवड्यात या मेळाव्याचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते झाला.

  निर्भया स्मारक - कोपर्डी गावामध्ये निर्भयाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या सुर्योदय या संस्थेच्या वतीने हे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमीपुजनही रविवारी करण्यात आले. हे स्मारक पीडित निर्भयाच्या कुटुंबियांच्या खाजगी जागेमध्ये बांधण्यात येणार आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad