Header Ads

 • Breaking News

  सिनेरिव्ह्यु : 'मॉम' - सावत्र आईच्या दुर्गावताराची कथा (व्हिडिओ)

  (व्हिडिओ खाली दिलेला आहे)

  मुंबई । DNA Live24 - स्वतःवर किंवा कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा सूड घेणारा हिरो प्रेक्षक म्हणून आपण सिनेमात अनेकदा पाहत आलो आहोत. बोनी कपूर निर्मित व रवी उद्यावार दिग्दर्शित ‘मॉम’ हा सिनेमाही अशाच सुडाची कथा आहे. पण इथे सूड घेणारा हिरो नसून, नायिका आहे. स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी एखादी आई कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, याचा थरार इथे दिसतो. विषयात फारसं नाविन्य नसलं तरीही वेगळ्या मांडणीसाठी व श्रीदेवीच्या खास अप्रतिम अभिनयासाठी ‘मॉम’ सिनेमा पाहायलाच हवा. महिलांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे हल्ले हे संदर्भ दिल्यामुळे हा सिनेमा अधिकच वास्तववादी होतो. 

  एकूण काय तर ‘मॉम’ ही आईच्या ‘दुर्गावतारा’ची गोष्ट आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी एखादा कर्ता पुरुष कोणत्या थराला जाऊ शकतो, हे ‘दृश्यम’मध्ये दिसलं होतं. इथे स्वतःच्या मुलीसाठी आई काय करू शकते, हे ‘मॉम’मध्ये दिसतं. या दोन्ही सिनेमांचा आशय व मांडणी वेगळी असली तरीही स्वत:च्या पातळीवर सूड उगवण्याचे समान सूत्र दोन्ही सिनेमांमध्ये एकच आहे. या सिनेमात नेमकं काय आहे, सिनेमा नेमका कसा आहे, हे जाणून घेऊन 'सिनेस्थेशिया' टीमचे सिने-समीक्षक विराज मुनोत यांच्याकडून... पाहुयात विराज 'मॉम'ला किती स्टार देतात ?

  'मॉम'चा सविस्तर रिव्ह्यु जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ 'प्ले' करा...


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad