728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव


अहमदनगर । DNA Live24 - शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. रामकृष्ण इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या कुंदा हळवे, सामाजिक कार्यकर्त्या अलका मुंदडा, न्यायाधार संस्थेच्या अ‍ॅड. निर्मला चौधरी, वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या वैशाली गांधी, निसर्गोपचार केंद्राच्या हेमा सेलोत, हमाल मापाडींसाठी कार्य करणाऱ्या लक्ष्मीबाई कानडे यांना मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्या बडवे, वैशाली मुनोत, मंगल गांधी, दिलदारसिंग बीर, हनिफ जरीवाला, सारंग पंधाडे, भुपेंद्र परदेशी, श्याम भिंगारदिवे, नागेश गवळी, रोहित शिंदे, प्रतिक शिंगवी आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात माणिक विधाते म्हणाले की, महिलांना त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर असून, त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव होणे अपेक्षित आहे. महिला आरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अरुण जगताप म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. राजकीय क्षेत्रात राहून खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला सक्षमीकरणाचे मोठे कार्य केले. त्यांच्या वाढदिवशी समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव होणे हे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सन्मान प्राप्त महिलांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव Rating: 5 Reviewed By: DNA Live24