728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

विद्यार्थ्यांसाठी कॉलेजात हेल्पलाईन नंबर उपलब्ध करा


अहमदनगर । DNA Live24 - अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना प्रवेशाचा कोटा वाढवून द्यावा तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करण्याची मागणी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी उपशिक्षणाधिकारी पांडुरंग मगर, खेडकर उपस्थित होते कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेणारा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे आश्‍वासन शिक्षणाधिकारी पोले यांनी देवून, विद्यार्थ्यांनी विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळण्याची अपेक्षा न ठेवण्याचे आवाहन केले.

प्रवेश प्रक्रियेत नियमानुसार विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला की नाही, याची पडताळणी करणे गरजेचे आहे. यावर्षी दहावीचा निकाल चांगला लागला असून, विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना सर्व निकषाचे पालण केले का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

दहावीच्या पास विद्यार्थ्यांची संख्या पाहता कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन त्यांची माहिती घ्यावी. ग्रामीण भागातील शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे देखील गरजेचे आहे.

बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची पध्दत माहिती नसल्याने ते प्रवेशापासून मुकले. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष प्रकाश भागानगरे, सारंग पंधाडे, वैभव ढाकणे, रेखा जरे, निलेश खरपुडे, संजय झिंजे, बाबासाहेब गाडळकर, रोहित शिंदे, सौरभ ठाणगे, सोपान कदम, रज्जाक बागवान उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: विद्यार्थ्यांसाठी कॉलेजात हेल्पलाईन नंबर उपलब्ध करा Rating: 5 Reviewed By: DNA Live24