728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

ओबीसी शिष्यवृत्तीत कपात : राष्ट्रवादीची निदर्शने


अहमदनगर । DNA Live24 - केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात अाली. तसेच केंद्र सरकारचा तीव्र स्वरुपाचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित खामकर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, प्रदेश महासचिव दत्तात्रय राऊत, सुभाष लोंढे, बाबासाहेब गाडळकर, सारंग पंधाडे, उमेश भांबरकर, दिपक खेडकर, आशिष भगत, मनोज खेडकर, किरण रासकर, अक्षय वैरागर, प्रमोद गांगर्डे, अक्षय गायकवाड, किरण मांडे, गिरीष रासकर, आनिल चव्हाण, गणेश चितळे, अमित रामदासी, संतोष जगदाळे, ऋषी राऊत, रवी जाधव आदिंसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारी आकडेवारी नुसार तीन वर्षापुर्वी पाचशे कोटीच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावून, यंदा केवळ 54 कोटी रुपयाची रक्कम ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी देवू केली आहे. सन 2014-15 साली केंद्रसरकारने 559 कोटी रुपये दिले होते. सन 2015-16 साली ही रक्कम 501 कोटी रुपये इतकी होती. तर सन 2016-17 साली अचानाक या रकमेत कपात होवून 78 कोटी रुपये झाली. तर सन 2017-18 या चालू वर्षी ही रक्कम अवघी 54 कोटीवर आली आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जात असते. यामध्ये इंजिनिअर, मेडिकल आदि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या शिष्यवृत्तीवर राज्यातील अल्प उत्पन्न गटातील लाखो ओबीसी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: ओबीसी शिष्यवृत्तीत कपात : राष्ट्रवादीची निदर्शने Rating: 5 Reviewed By: DNA Live24