Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २२ जुलै, २०१७

'ऑपरेशन मुस्कान'मध्ये सापडली १९ बालके


शिर्डी । DNA Live24 - ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जुलै महिन्यात जिल्हाभरात हरवलेली १९ बालके गवसली आहेत. या बालकांची ओळख पटवून त्यांचे पुनर्वसन करण्यात यश अोल आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात ही बालके सापडली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हा बाल सरंक्षण कक्षाचे अधिकारी बाळा हेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या संयुक्त मोहिमेत ही कामगिरी करण्यात आली.

हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मूळ पालकांकडे सोपवण्यासाठी "आॅपरेश्न मुस्कान' ही मोहिम राबवण्यात येते. गेल्या वर्षीही ही मोहिम राबवण्यात आली होती. यंदा १ जुलै ते ३१ जुलै या कालवधीत दोन टप्प्यात ही मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक स्थापन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस काॅन्स्टेबल साेमनाथ कांबळे, शशी वाघमारे, सलीम शेख, मोनाली घुटे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी बाळा हेडे यांचा या पथकामध्ये समावेश होता. या पथकाने शिर्डी शहरामध्ये ऑपरेशन मुस्कान मोहिम राबवली. त्याअंतर्गत एकूण १५ मुले व ४ मुली त्यांना सापडल्या. या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले.

विशेष म्हणजे २० जुलै या एकाच दिवसामध्ये ही एकोणीस बालके सापडली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पालकांचा शोध घेऊन कागदपत्रांची पूर्तता करुन त्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले. बाल न्याय अधिनियमानुसार राज्यात हरवलेल्या तसेच सापडलेल्या बालकांसाठी विशेष बाल पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक हरवलेल्या बालकांचा शोध घेणार आहे.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages