Header Ads

 • Breaking News

  काव्यामध्ये समाजपरिवर्तन करण्याची ताकद - दौंडकर


  अहमदनगर । DNA Live24 - काव्यामध्ये समाज परिवर्तन करण्याची ताकद आहे. समाज मनाची जडणघडण कवितातून होत असते. कविता जीवनातील सुख-दु:खाची सांगाती असून शिक्षण क्षेत्रातील लेखक मंडळी कथा, काव्यातून प्रकट होत असल्याने ही समाज परिवर्तनाची नांदी ठरेल, असे मत प्रसिध्द कवी भरत दौंडकर यांनी व्यक्त केले.

  राहुरी येथील जिल्हा प्राथमिक शिक्षिका व गुरूकुल शिक्षण मंडळाच्या राहुरी महिला तालुकाध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे यांच्या "चांदणझुला' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन रावसाहेब पटवर्धन सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. संजय कळमकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अशोक कडूस, महिला जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग, रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, कल्याण ठोंबरे आदी शिक्षक नेते उपस्थित होते.

  या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी कवियत्री इंगळे यांनी भूषण नगर येथील सावली संस्थेला अकराशे रूपयांची मदत मुख्याद्यापक अंबादास मंडलिक यांच्याकडे सुपूर्त केली. डॉ. कळमकर म्हणाले, प्रत्येक साहित्यिकाने आपल्या काव्यातून, कथेतून शिक्षक हा घटक मध्यवर्ती ठेऊनच लेखन केल्याचे जाणवते, त्याचे कारणही तसेच आहे, शिक्षक हा असा घटक आहे,की, तो संवेदनशिल समाजाची जाण असलेला असल्याने त्यावर लिखाण करण्याला सोपे जाते व तो काही म्हणतही नाही.

  समाज घडवताना शिक्षिका समाजमन, स्त्रीविश्‍व, त्यांना भावलेले अनुभव आपल्या काव्यातून मांडतात. नेमका तोच प्रयत्न जयश्री इंगळे यांनी "चांदणझुला' या काव्य संग्रहातून तरलता, भावूकता, समाजाविषयी, कुटुंबाविषयी, शिक्षणाविषयीचे प्रेम यातून सहजतेने मांडला आहे. आजच्या शिक्षकांनी वाचनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे, विविध विषयांवर लिहिलेली अवांतर पुस्तकेही शिक्षकांनी वाचली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

  या वेळी शिक्षणाधिकारी कडूस यांनीही मनोगत व्यक्त केले, प्रारंभी उध्दव इंगळे यांनी स्वागत केले, कवियत्री जयश्री इंगळे यांनी काव्यसंग्रहा बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन शिंदे यांनी केले. यावेळी राहुरी, नगर, संगमनेर, नेवासा तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad