728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तिसगाव बलात्कार : 'तो' नराधम सीसीटीव्हीत कैद


पाथर्डी । DNA Live24 - मांडवे (ता. पाथर्डी) येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले असून या आरोपीची माहिती पोलिसांना द्यावी, असे अावाहन नागरिकांना करण्यात आले आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशीही अनोळखी आरोपीचा शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी चार तपास पथके तैनात केली आहेत.

शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मांडवे (ता. पाथर्डी) येथील सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अज्ञात व्यक्तीने तिसगावजवळ अत्याचार केला. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी अाईसह पायी निघाली होती. तेथून अनोळखी व्यक्ती दुचाकीवर तिसगावकडे जात होता. मुलीच्या आईने त्याला थांबवून तिसगावकडे जात आहात का, असे विचारून मुलीला त्याच्याबरोबर दुचाकीवर बसवून पाठवले. पुढे गेल्यावर त्याने सौंदडीचा माथा परिसरात मुलीवर अत्याचार केला.

नंतर पुन्हा मुलीला दुचाकीवर बसवून तिसगावातील मिरी रस्त्यावरच्या चौकात उतरवून दिले. नंतर तो पसार झाला.अत्याचारित मुलगी रडू लागली. मांडवे व तिसगाव ग्रामस्थांनी चाैकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून पाथर्डी, नगर शहरात मोर्चे निघाले. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले अाहे. आरोपीच्या शोधासाठी चार तपास पथके रवाना केली आहेत. 

शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पाथर्डीचे पीआय राजेंद्र चव्हाण, एलसीबीचे एपीआय संदीप पाटील यांची पथके आरोपी शोधत आहेत. घटनेनंतर आरोपी मुलीसोबत दुचाकीवरुन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज रविवारी दुपारी पोलिसांना प्राप्त झाले. फरार आरोपी ३५ ते ४० वयोगटातील असून त्याच्याकडे हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी आहे. 

या आरोपीविषयी कोणाला काही माहिती असल्यास पोलिस उपअधीक्षक शिवथरे यांना ९७ ६६ ७०३ २९६ या क्रमांकावर, तर एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना ९८ २३ २६६ २३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, आणि आरोपीविषयी माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तिसगाव बलात्कार : 'तो' नराधम सीसीटीव्हीत कैद Rating: 5 Reviewed By: DNA Live24