Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २२ जुलै, २०१७

१ ऑगस्टपासून रेशन दुकानदार संपावर


राहुरी । DNA Live24 - स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासन धोरणाच्या निषेधार्थ 1 ऑगष्ट पासुन बेमुदत संपावर जाण्याचा इशारा रेशन दुकानदारांनी दिला आहे. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बेमुदत  संपावर जाण्याबाबतचे निवेदन नुकतेच राहुरीच्या नायब तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांना दिले.

या निवेदनात म्हटले की स्वस्त धान्य वाटपासाठी पाॅज मशिन ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित झाली आहे.  माञ अद्याप आधार फिडींग न झालेले शिधापञिका धारक स्वस्त अन्नधान्य वाटपापासुन वंचित राहणार आहेत. महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान गोदामातुन धान्याची वाहतुक सुरू होते. माञ शासनाने महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत धान्य वाटप करण्याची अट दुकानदारांना घातली आहे.

अवघ्या 10 दिवसात धान्याचे वितरण कसे करणार, हा सवाल स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. स्वस्त धान्य दुकानात पाॅज मशिनचा वापर सुरू झाल्यास ताळेबंद, नफातोटा पञक काढणे अवघड होणार असल्याचे दुकानदारांनी म्हटले आहे. आधार फिडींगचे काम पुर्ण झाल्यानंतर पाॅज मशिनची सक्ती करावी, धान्याचे वजन करून मिळावे, अशी रेशन दुकानदारांची मागणी आहे.

तसेच तामिळनाडू व झारखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अन्न महामंडळाची स्थापना करून शासकीय नियमाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांना पगार देण्यात यावा, ही मागणीही करण्यात आली आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाणार असल्याचे निवदेनात म्हटले आहे. या निवेदनावर तालुक्यातील 44 स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages