728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जिओ फोन फुकटात ! लाइफटाइम कॉलिंग फ्री !


मुंबई । DNA Live24 - रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओने देशातील पहिला स्वस्त व स्मार्ट 4G फीचर फोन लॉन्च केला. जिओच्या 4G व्होल्ट फोनची किंमत शून्य आहे. पण त्यासाठी दीड हजार रुपये सिक्युरिटी डिपॉ‍झिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. 3 वर्षांनंतर ते परत मिळतात. २४ ऑगस्टपासून या फोनसाठी बुकींग करता येणार आहे. सप्टेंबरपासून फोन डिलिव्हरी मिळेल. 

जिओ फोनचे फीचर्स - अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 4 वे नेव्हिगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4'', QVGA डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट, मायक्रोफोन अॅण्ड स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्चलाइट, एफएम रेडियो. व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेसोबत अनेक फीचर आहेत. जिओच्या सर्व अॅप्स या फोनसमोत अगदी मोफत आहेत. सोबतच लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच २२ भाषांचा समावेश करण्‍यात आल्याचे आकाश अंबानी यांनी सांगितले आहे.

धनधनाधन प्लान 153 रुपयांत - जिओने फोनसोबतच डेटा प्लानही लॉन्च केले दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन २४ रूपयांत तर आठवड्यांचा प्लॅन ५४ रूपयांत उपलब्ध आहे. टीव्ही केबलचा प्लान 309 रूपये (प्रति महिना) असेल. त्याचप्रमाणे अनलिमिटेड धनधनाधन प्लान १५३ रूपयांत उपलब्ध आहे. एका आठवड्याला ५० लाख ग्राहकांपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचे रिलायन्सचे लक्ष्य आहे.

२४ ऑगस्टपासून बुकिंग - जिओचा नवा स्मार्ट 4G फोन २४ ऑगस्टपासून प्रीबुक करता येईल. सप्टेबरपासून फोनची डिलिव्हरी मिळेल. प्रत्येक आठवड्याला ५ लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. मोबाईल डेटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले. जिओच्या माध्यमातून आम्ही १२ महिन्यांत देशातील 99% लोकांपर्यंत पोहोचलो, असे रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

अंबानी यांनी सांगितले की, भारतात ७८ हजार कोटी फोन आहेत. ५० कोटी लोकांना स्मार्टफोन सुविधा मिळत नाहीत. देशात ५० कोटी फीचर फोन आहेत. ज्यांना स्मार्टफोनचे फायदे घेता येत नाहीत. एका सेकंदाला ७ ग्राहक जिओशी जोडले जातात. अंबानींच्या भाषणात धीरुभाई अंबानींचा उल्लेख झाल्याने सर्व भावूक झाले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जिओ फोन फुकटात ! लाइफटाइम कॉलिंग फ्री ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24