728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सिनेरिव्ह्यु: 'रिंगण' : सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधाचा प्रवास (व्हिडिओ)

(व्हिडिओ खाली दिलेला आहे)

मुंबई । DNA Live24 - राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘रिंगण’ हा मराठी चित्रपट ३० जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ६३ वा राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगण आपले नाव कोरले. तसेच ५३ व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

इतकेच नाही, तर रिंगणने कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा ‘रिंगण’ अखेर प्रदर्शित झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनी प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाचा रिव्ह्यू घेऊन येत आहेत विराज मुनोत... 

तर पहा कसा आहे रिंगण...  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सिनेरिव्ह्यु: 'रिंगण' : सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधाचा प्रवास (व्हिडिओ) Rating: 5 Reviewed By: DNA Live24