Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १७ जुलै, २०१७

बस जाळपोळीच्या गुन्ह्यातून संजीव भोर यांच्यासह १२ जण निर्दोष


नेवासे । DNA Live24 - सन २००८ मध्ये नगर-आैरंगाबाद महामार्गावर पांढरी पूल येथे झालेल्या आंदोलनात बस जाळण्यात आली होती. याप्रकरणी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या खटल्यातून भोर यांच्यासह इतर सर्वांची नुकतीच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नेवासे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

मराठा समाजास सरसकट कुणबी संबोधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ऑगस्ट 2008 मध्ये नगर जिल्ह्यात प्रचंड उद्रेक झाला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी संजीव भोर, आदिनाथ काळे यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील पांढरी पुल येथे जिल्हाव्यापी आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर आरक्षण प्रश्नी सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्ष व हेळसांडीबाबत प्रचंड रोष व्यक्त होऊन त्याचे रूपांतर उद्रेकात झाले.

संतापलेले हजारो कार्यकर्ते नगर-औरंगाबाद रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करू लागले. या ठिकाणी संतप्त जमावाने प्रवाशांना बस मधून खाली उतरवून एशियाड बस पेटवली. इतर बसेसची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. या प्रकरणी सोनई पोलीस स्टेशनमध्ये 5 ऑगस्ट 2008 रोजी भारतीय दंड विधान कलम 353, 143, 146, 147, 341, 336, 435, 427, 109 कलम 7, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 व मुंबई पोलिस कायदा कलक 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर, आदिनाथ काळे, कोपरगाव नगरपालिकेचे बांधकाम सभापती बाळासाहेब आढाव, नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, विनय भगत, दिपक वाजे, सतीश थोरात, सुधीर गायकवाड, रमेश मोकाटे, गणेश चोथे, सोमनाथ मोकाटे, राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या न्यायालयीन खटल्याची सुनावणी नेवासा कोर्टातील प्रथम वर्ग न्यायाधिशांपुढे चालली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर पुरावे तपासण्यात आले. 

मात्र या कार्यकर्त्यांविरोधात सबळ पुरावा न आढळल्यामुळे न्यायालयाने सर्व 12 जणांना निर्दोष मुक्त केले आहे. या कार्यकर्त्यांतर्फे अॅड. किशोर ढेरे, अॅड. स्वप्निल सोनवणे, आदी वकिलांनी काम पाहिले. सामाजिक बांधिलकीतून हा खटला चालविणाऱ्या सर्व विधिज्ञांचे सकल मराठा समाजातून आभार व्यक्त करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच राहिल. सरकारने आरक्षण व इतर मागण्यांबाबत आणखी अंत न पाहता लवकरात मागण्या मान्य कराव्यात, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages