728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'ऑल आऊट' मोहिमेत ७४ आरोपी जेरबंद !


अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यात "ऑल आऊट मोहिमे'अंतर्गत एकाच रात्री तब्बल ७४ फरार आरोपी गजाआड करण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, रोहिदास पवार, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणीही करण्यात आली. ऑल आऊट मोहिमेअंतर्गत फरार आरोपी, पाहिजे असलेले, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी वस्त्या, वॉरंटमधील आरोपींचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात अटक वॉरंटमध्ये ७४ जणांना अटक करण्यात आली. तर हद्दपार असूनही जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या प्रकाश शिवाजी रणनवरे (श्रीरामपूर) व विकास उर्फ शनि भानुदास गोरे (बेलापूर, श्रीरामपूर) हे मिळून आले. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात अाली आहे.

याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी मोहिम राबवून वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोटार वाहन कायद्यान्वये एकूण २४८ केसेस करण्यात आल्या. या कारवाईद्वारे ७४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगारांना तपासण्यात आले. ही मोहिम यापुढेही पोलिस ठाण्यांच्या पातळीवर सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'ऑल आऊट' मोहिमेत ७४ आरोपी जेरबंद ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24