728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

संतसंगती केली तर परमेश्वर प्राप्ती शक्य !


अहमदनगर । DNA Live24 - परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. परंतु अज्ञानाची काजळी डोळ्यावर आल्याने देव दिसत नाही. संत संगती केली तर विवेकी ज्ञान मिळून परमेश्वर प्राप्ती होते, असे प्रतिपादन युवा विचावंत सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले. वाहिरा येथे संत वाघे दगडूभाऊ मेटे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी दगडू आण्णा जाधव, विजय महाराज घोंगडे, मुरलीधर मेटे, आबासाहेब मेटे, बाबुराव आटोळे, माणिक जेधे, नानाभऊ आटोळे, सुभाष झांजे, शिवाजी झांजे, बापु शिंदे, शहादेव मेटे, महादेव मेटे, चितळे माऊली, गाडे महाराज, ज्ञानदेव झांजे, दत्तु सायंबर, भानुदास सायंबर, भाऊसाहेब मेटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मेटे म्हणाले, संत संगतीने परमेश्वराची प्राप्ती होते. जसे चंदणाच्या संगतीत सुगंध प्राप्त होतो तसेच संताचे ही आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण चिंताक्रांत आहे. तो भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. या सुखाने इंद्रियांना समाधान मिळते. परंतु चित्त शुध्द होत नाही. ते अांतरिक समाधानावर अवलंबुन आहे. त्यासाठी अवघी चिंता जायला नको तर ती चिंता वारली पाहिजे. कारण मेलेली गोष्ट परत येत नाही. संत संगती म्हणजे संताच्या विचारधारेवर चालणे.

संत साहित्याचे वाचन मनन प्रत्येकाने केले पाहिजे. समाजामध्ये अनेक प्रकारचे वेशधारी संत निर्माण झाले आहेत. समाजाला नानाविध प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून खरे संत ओळखता आले पाहिजेत. खरे संत समाजासाठी, अज्ञानी लोकांसाठी अविरत ज्ञान दानाचे कार्य करून परिर्वतन घडून आणतात.

हे परमेश्वराचे भक्ती सोडता इतर कोणत्याही घटकांना महत्व देत नाहीत. तेच खरे संत म्हणून या संतांचा संग केल्यास परमेश्वर प्राप्ती होण्याचा सुलभ मार्ग ते सांगतात. हरिहरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व रेवन्नाथ मेटे, नानाभाऊ आटोळे यांनी तर मृदंग साथ नारायण महाराज गांगर्डे यांनी केली. आभार सोमनाथ मेटे महाराज यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: संतसंगती केली तर परमेश्वर प्राप्ती शक्य ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24