728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जातीय सलोख्यासाठी 'सोशल क्लब'चे कार्य समाजोपयोगी


अहमदनगर । DNA Live24 - सामाजिक कार्यामुळे अहमदनगर सोशल क्लबने वेगळा ठसा उमवटला अाहे. ईद मिलन कार्यक्रमातून जातीय सलोखा जोपासणारे त्यांचे कार्यही समाजोपयोगी आहे, असे प्रतिपादन सहायक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांनी केले. अहमदनगर सोशल क्लब कार्यालय, करसेठजी रोड येथे आयोजित शिरखुरमा पार्टी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.

समाजाला चांगल्या युवकांची गरज असुन आज भारतामधे 60 ते 70 टक्के समाज हा तरूण आहे. तरूणांचा देश घडविण्यात मोठा वाटा आहे. सोशल क्लबमधेही युवा वर्ग असुन सर्व धर्मिय, सर्व राजकिय पक्षाचे युवक कार्यकर्ते यात सामील आहेत. जातीय सलोखा नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती विरूध्द आम्ही सर्व युवक पोलिस प्रशासना सोबत आहोत, अशी ग्वाही पहिलवान मोसीम खान यांनी दिली.

अहमदनगर सोशल क्लब चे प्रमुख नईम सरदार यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल, गुलाब पुष्प देवुन सत्कार केला. तसेच अहमदनगर सोशल क्लब करीत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची माहिती दिली. पाहुण्यांनी अहमदनगर सोशल क्लब तर्फे आयोजित शिरखुर्माचा आहार घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इम्रान अन्वर खान यांनी केले. तर आभार नईम सरदार यांनी मानले.

यावेळी सोशल क्लबचे प्रमुख नईम सरदार, इम्रान अन्वर खान, जिया खान, मोसिम शेख, अज्जु शेख, अन्जर खान, कासम केबलवाले, शरीफ सय्यद, अशरफ शेख, राजु जहागिरदार, जावेद सिमला, अजहर सुभेदार, शादाब शेख, राजमोहम्मद नुरी, सय्यद साजिद, शेख शकील, अयान नईम, अलीशान सलीम, सानिया नईम आदीं उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जातीय सलोख्यासाठी 'सोशल क्लब'चे कार्य समाजोपयोगी Rating: 5 Reviewed By: DNA Live24