Header Ads

 • Breaking News

  इमामपुरातील खिरणीच्या महादेवाला महारुद्र अभिषेक


  घोडेगाव । DNA Live24 (दिलीप शिंदे) - खिरणीचा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमामपूर (ता. नगर) घाटातील महादेव मंदिरात नुकताच महारुद्र अभिषेक व महाप्रसादाचा सोहळा पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. भाविकांनी महादेवाचे दर्शनाला व महाप्रसादाला उदंड प्रतिसाद दिला. नगर-आैरंगाबाद महामार्गापासून अतिशय निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे.

  इमामपूर घाटातील मारुती मंदिरापासून २ किमी पश्चिमेला खिरणीच्या महादेवाचे मंदिर आहे. गेल्या वर्षी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याच्या एक वर्षपूर्ती निमित्ताने कीर्तन, महारुद्ध अभिषेक व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली.घोडेगाव येथून हर हर महादेवचा गजर करत मोटार सायकल रैली काढली होती . त्यात चार पाचशे मोटार सायकल चा सहभाग होता .

  या निमित्ताने सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत महारुद्र अभिषेक करण्यात आला. तर दहा ते बारा पर्यंत महामंडलेश्वर कृष्णानंद महाराज (शनि शिंगणापुर) यांचे कीर्तन संपन्न झाले. तर दुपारी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या सर्व भक्तांना आयोजकांच्या वतीने भगवी शाल भेट देण्यात आली.

  या सोहळ्याला कार्यक्रमास किमान सहा हजार भाविकांनी हजेरी लावली. त्यात नव्वद टक्के युवा वर्ग होता. अतिशय तन्मयतेने, निरपेक्ष भावनेने युवा वर्गाने कार्यक्रमाची जबाबदारी पेलली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णाभाऊ फुलमाळी मित्र मंडळ, आई प्रेम ग्रुप, शंभो बॉईज ग्रुप, रामबाबा मित्र मंडळ, शिव मल्हार ग्रुप घोडेगाव व इमामपुर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad