Header Ads

 • Breaking News

  क्रीडा संघटनांचे शालेय स्पर्धांवर बहिष्कारास्त्र !


  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्रात 28 एप्रिलच्या शासन परिपत्रकानुसार शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी केल्याने हजारो क्रीडा शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदावर गदा आल्याने महाराष्ट्र भरातून सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना तसेच शिक्षण संचालक, आयुक्त, क्रीडा आयुक्त, प्रधान सचिव, क्रीडा मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. तरीही उपयोग हाेईना. त्यामुळे आता शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  प्राध्यापक सुनिल जाधव, मुख्यध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र कोतकर, घनश्याम सानप यांनी ही माहिती दिली आहे. बहिष्कारा दरम्यान शालेय स्पर्धा आयोजन, नियोजन बैठकीस शिक्षक क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, बैठकीस उपस्थित राहणार नाही. ऑनलाईन एन्ट्री नोंदविणे, विद्यार्थ्यांनां स्पर्धेस घेऊन जाणे, स्पर्धेत सहभागी होणे, स्पर्धा आयोजन-नियोजन करणे, स्पर्धेत पंच म्हणून काम करणे इत्यादी कुठल्याही बाबतीत क्रीडा कार्यालयास सहकार्य केले जाणार नाही. कमी झालेल्या तासिका शासन पूर्ववत करत नाही तो पर्यंत बहिष्कार कायम राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

  या बैठकीला राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, दत्ता नारळे, बाबा बोडखे, राजेंद्र कोतकर, संजय साठे, अशोक डोळसे, सुनील गागरे, प्रताप सुसरे, भरत बिडवे, घनश्याम सानप, भानुदास तमनर, बळीराम सातपुते, राघवेंद्र धनलगडे, बबन गायकवाड, कल्याण ठोंबरे, बेंद्रे भाऊसाहेब, शौकत शेख, प्रशांत होन, महेंद्र हिंगे, बापू होळकर, औटी दत्तात्रय, धामणे शिवाजी, हनुमंत गिरी, प्रशांत पाटोळे, उमेश झोटिंग, ज्ञानेश्‍वर रसाळ, नंदू शितोळे, विनायक गोरखे, रमेश लव्हाट, माने किसन, बाळू बोडखे, रमजान हवालदार, जयसिंग काळे, विवेक सूर्यवंशी, पानसरे सी. जी. तसेच क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad