728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेवर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार


अहमदनगर । DNA Live24 - शासनाने कला-क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून वाडियापार्क क्रीडा संकुल येथे मनपा व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेवर क्रीडा शिक्षकांनी बहिष्कार टाकला. यामुळे स्पर्धेला प्रारंभ होवू शकले नाही. तर स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या फुटबॉल संघांना माघारी फिरावे लागले. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंपुढे क्रीडा शिक्षकांनी आपली भुमिका मांडून, शासनाचे चुकीचे धोरण स्पष्ट केले.

घनश्याम सानप यांनी शासनाने कला, क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी करत असल्याने अनेक शिक्षक कमी होणार आहे. शाळेत कला व क्रीडाचे तास न झाल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवून, आनंदी शिक्षणाचा बट्टयाबोळ होणार असल्याचे सांगितले. संजय साठे म्हणाले की, शासन ऑलंम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खर्च करुन, पदक मिळविण्याची अपेक्षा करत आहे. मात्र मुलांना विद्यार्थीदशेतच खेळा पासून दूर केल्यास भावी खेळाडू घडणार नाही.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी कला व क्रीडांचे तास आवश्यक आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे भविष्यातील पिढीचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाने कला-क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने या स्पर्धेवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन कला, क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने मनपा क्रीडा विभाग प्रमुख विल्सन फिलिप्स व रामदास ढमाले यांना देण्यात आले.

यावेळी क्रीडा शिक्षक बळीराम सातपुते, घनश्याम सानप, संजय साठे, सोनाली पटेकर, साईनाथ कोल्हे, प्रसाद पाटोळे, अक्षय नायडू आदि उपस्थित होते. शासनाच्या कला, क्रीडा धोरणाविषयी जो पर्यंन्त सकारात्मक निर्णय होत नाही. तो पर्यंन्त या क्रीडा स्पर्धांवर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार असणार असल्याने, सदर स्पर्धा पुढे ढकळण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमांचे शालेय संघ स्पर्धेसाठी येत असल्याने या स्पर्धेसाठी संघ न पाठविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेवर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार Rating: 5 Reviewed By: DNA Live24