728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आषाढीनिमित्त हजारो भाविकांकडून पैस खांबाचे दर्शन


नेवासे । DNA Live24 - आषाढ़ी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात पंचक्रोशीतून तसेच लांबून आलेल्या भक्तांनीही पैस खांबाचे मनोभावे दर्शन घेतले.

एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ वाजता, मंदिर विश्वस्त कैलासराव जाधव व प्रतिभाताई जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर माऊलीचे मूर्तीमंत रूप असलेल्या "पैस"खांबाची अभिषेकाद्वारे विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी रामभाऊ कडू, गोरख भराट, भाऊराव सोमुसे, गुरुवर्य बन्सी महाराज तांबे, ज्ञान प्रबोधन वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दिवसभरात आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले, विश्वस्त गोविंदराव शेटे, रामभाऊ जगताप, व्यवस्थापक भगवानराव सोनवणे, लक्ष्मण भवार यांनी स्वागत केले.
  
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराबाहेर सौंदर्य प्रसाधने, खेळणी, कुंकू, ग्रंथ, हार, पान फुले, गृहपयोगी वस्तूंच्या दुकाना ही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या होत्या. नेवासा शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, श्री मोहिनीराज मंदिरामध्ये ही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दिवसभरात हजारो भाविकांनी पैस खांबाचे मनोभावे  दर्शन घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आषाढीनिमित्त हजारो भाविकांकडून पैस खांबाचे दर्शन Rating: 5 Reviewed By: DNA Live24