728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तोफखान्याचे पीआय राकेश मानगावकर निलंबित

अहमदनगर । DNA Live24 - गांजातस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याचा ठपका ठेवत तोफखाना ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी ही कारवाई केली. शहर उपविभागाचे सहायक अधीक्षक अक्षय शिंदे यांनी निलंबनाचा आदेश बजावला.

तोफखाना पोलिसांनी १८ जूनला सुमारे १ कोटीचा गांजा जप्त केला होता. याप्रकरणी मुख्य सूत्रधार महिलेसह पाच आरोपींना अटक झाली होती. पोलिसांनी आरोपींकडून ८६ हजार ५०० रुपयांची कॅशदेखील जप्त केली होती. याप्रकरणी ताेफखाना ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला. एवढ्या मोठ्या रकमेचा गांजा प्रथमच पकडल्यामुळे तोफखाना पोलिसांची चांगलीच वाहवा झाली होती.

या गुन्ह्याचा तपास पीआय राकेश मानगावकर हे स्वत: करत होते. तपासात काही आरोपींची नावे निष्पन्न झाली. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेने मानगावकर यांना आरोपींची संख्या न वाढवण्याची विनंती केली होती. आरोपींची संख्या न वाढवण्यासाठीच मोठी आर्थिक तडजोड झाल्याचे म्हटले जात होते. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यामुळे मानगावकर यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर पाथर्डीचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची बदली झाली आहे. तर पाथर्डीचा पदभार शिंगणापूरच्या पोलिस निरीक्षकांकडे गेला आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच आर्थिक तडजोडीचा प्रकार असल्यामुळे मानगावकर यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाही ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तोफखान्याचे पीआय राकेश मानगावकर निलंबित Rating: 5 Reviewed By: DNA Live24