728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आदिवासी मेळघाट परिसर शेतकरी आत्महत्यामुक्त


अहमदनगर । DNA Live24 - भारतातील महारष्ट्रसह सात राज्यात सध्या शेतकरी आत्महत्यांचे थैमान सुरु आहे. असे असले तरी बहुसंख्य आदिवासी असलेला मेळघाट परिसर मात्र शेतकरी आत्महत्यामुक्त आहे,असे प्रतिपादन डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले. शेतीचे प्रगत तंत्रज्ञान आदिवासींपर्यंत पोहोचाविल्याने हा बदल घडविता आल्याचे त्यांनी नमूद केले. मेळघाट येथे गेली ३३ वर्ष आदिवासी भागात कार्यरत असलेले डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांनी नुकतीच स्नेहालय प्रकल्पाना भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण घेतानाच आदिवासी भागात जाऊन कार्य करण्याचा निश्चय केला होता. तेव्हाच त्यांना मेळघाट येथील कुपोषित बालकांसंबंधी माहिती मिळाली. हेच आपले कार्यक्षेत्र त्यांनी निश्चित केले. पीएसएममध्ये उच्च शिक्षण घेऊन काम सुरु केले. बेराहागड ही त्यांची कर्मभूमी. सुरवातीला हे ठिकाण खरचच बिन रस्त्याचे होते. तब्बल ४० कि. मी चालत जावे लागत असे. पण आज केवळ बेराहागडअच नाही तर परिसरातील सर्वच गावे रस्त्यांनी जोडले गेले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय कोल्हे दाम्पत्यास जाते.

बालकांचे कुपोषण, आदिवासींसाठी शासनाची पीबीएस योजना, शेती करण्याचे नवीन उपाय डॉ. कोल्हे यांनी केले आहेत. डॉ. स्मिता म्हणाल्या, एक अनाथाश्रम काढण्याचा विचार घेऊन त्या पोहोचल्या. पण त्यांना कळाले की आदिवासी लोकांमध्ये एकही अनाथ मुल नाही. कारण लग्नाच्या आधी झालेल्या मुलाला देखील लग्न केल्यानंतर पुरुष स्वतःचे नाव देतात. त्यामुळे कुमारी माता ही समस्याच तेथे नाही. मनाने अतिशय निर्मळ व एकदा विश्वास बसल्यावर कधीच साथ न सोडणारे हे लोक खूप जवळचे वाटतात.

डॉ. कोल्हे मेळघाटच्या सृष्टीसौंदर्याला काश्मीरची उपमा देतात. गेली काही वर्ष डॉ. कोल्हे यांच्या प्रकल्पात वर्षातून दोन वेळा श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. ज्या तरुणांना सामाजिक क्षेत्रात कार्य कार्याचे आहे, वेगळ्या वाट निवडायच्या आहेत, असे लोक शिबिरात येतात. एक अनोखा अनुभव, निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वावलंबन शिकणे, शेतीमधील विविध प्रयोग, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे,अगदी शौचालय साफ करण्यापर्यंत अनेक अनुभव येणारे शिबिरारार्थी घेतात.

कोल्हे दाम्पत्या मुलगा रोहित शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे. मेळघाटातील आदिवासींना त्यांनी शेतीचे प्रगत तंत्रज्ञान शिकविले आहे. त्यामुळेच आज डॉ. कोल्हे यांचा कार्यक्षेत्रात शेतकरी आत्महत्येची समस्याच नाही. दुसरा मुलगा राम वैद्यकीय शिक्षण घेऊन सोबतच कार्य करणार आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आदिवासी मेळघाट परिसर शेतकरी आत्महत्यामुक्त Rating: 5 Reviewed By: DNA Live24