Header Ads

 • Breaking News

  दोन मृतदेह आढळल्याने शेवगावात पुन्हा खळबळ


  शेवगाव । DNA Live24 - गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चौघा जणांच्या निर्घृण हत्याकांडामुळे शेवगाव शहर हादरले होते. आता पुन्हा एकदा शेवगाव परिसरात दोघांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शेवगाव आखेगाव रोडवर दोन पुरुष व एक महिला मृत अवस्थेत आढळले आहेत. यापैकी एक पुरूष अत्यवस्थ असल्यामुळे त्याला तत्काळ नगरला हलवण्यात आले. मृतांची नावे निष्पन्न झाली असून तिघेही शेवगावातील रहिवासी आहेत.

  दिपक रामनाथ गोर्डे (रा. धनगर गल्ली, शेवगाव) व मंगल अळकुटे (सध्या रा. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर बाळू रमेश केशभट (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) हा अत्यवस्थ अवस्थेत आढळला. त्यांच्या जवळ दारुच्या बाटल्या, स्कार्फ, तीन मोबाईल, बिस्किटचा पुडा, चप्पल, निरोध, असे साहित्य पडलेले होते. पोलिसांनी पंचनामा करुन सर्व साहित्य जप्त केले आहे. शेवगाव ते आखेगाव रस्त्याच्या कडेला एका शेतात ही घटना घडली. या घटनेची माहिती समजल्यामुळे परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

  शेवगाव आखेगाव रस्त्यावर रस्त्याच्या कडेला एका शेतामध्ये एका मोटारसायकल व तिघे जण पडल्याचे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी पाहिले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. काही वेळाने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अॅडिशनल एसपी घनश्याम पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले.


  Post Top Ad

  Post Bottom Ad