728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगरचे चंदनचोर पुण्यात मुद्देमालासह जेरबंद


पुणे । DNA Live24 - चंदनाच्या लाकडांची चोरी करुन विक्रीच्या उद्देशाने थांबलेल्या नगरच्या दोन चंदनचोरांना पुण्याच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पोलिस पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी पुण्यातील साधू वासवानी चौकामध्ये करण्यात आली. 

विष्णू विठ्ठल गायकवाड (वय ३२, शेवगाव, हल्ली रा. शिरुर) व किसन लक्ष्मण लक्ष्मण गायकवाड (वय ३५, रा. बाबुर्डी घुमट, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

साधू वासवानी चौकात चंदन विकायला थांबलेले असताना पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडले. त्यांच्या ताब्यातून कुऱ्हाडी, कुदळी, वाकस, कानस, किकर, हत्यार घासण्याचे निसणे तसेच चोरीचे १ लाख रुपयांचे चंदन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.  त्यांनी पुण्यात पाच ठिकाणी चंदनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

गुन्हे शाखेचे राम राजमाने, फौजदार उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चौहान, रविंद्र कदम, हवालदार भालचंद्र बोरकर, सुनिल चिखले, गणेश साळुंके, प्रविण तापकीर, संजय बरकडे, उजय उत्तेकर, कैलास साळुंके, रमेश चौधर, आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपींनी पुण्यात पाच चंदनचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून पोलिस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगरचे चंदनचोर पुण्यात मुद्देमालासह जेरबंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24