728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलि-मेडिसिन सुविधा


अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा कारागृहात व्हिडिओ कान्फरसींग रूम व टेलि मेडिसीन युनिट सुरु करण्यात आले आहे. या सुविधेचे उद्घाटन नुकतेच जिल्हा न्यायाधीश पी. आर. भावके यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणेचा वापर करून कारागृहातील बंद्यांना आता न्यायालयासमोर हजर करुन बंद्यांचे जबाब नोंदवता येत आहेत. तसेेच अनेक बंद्यांना निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणेव्दारे देण्यात आले आहेत.

दोन्ही सेवेच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे केस्तीकर, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक अरूण जगताप तसेेच लिगल एडचे वकील, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, महानगरपालिका, प्रयास सामाजिक संस्था इत्यादीचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.

कारागृहातील बंद्यांना शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारींचे समक्ष टेलि-मेडिसीन यंत्रणेव्दारे हजर करून त्यांच्या आजारांवर वैद्यकीय अधिकारींऱ्यांचा सल्ला घेऊन त्वरीत उपचार चालू करण्यात येतात. यासाठी टेलि-मेडिसीन यंत्रणेचा खूप चांगला उपयोग होत अाहे. तसेच त्याचा बंद्यांच्या व कारागृहाच्या सुरक्षेसाठी देखील फायदा होत आहे, असे कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत व वरिष्ठ जेलर श्यामकांत शेडगे यांनी सांगितले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलि-मेडिसिन सुविधा Rating: 5 Reviewed By: DNA Live24