728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य - जिल्हाधिकारी


अहमदनगर । DNA Live24 - भारतीय लोकशाही आता परिपक्व होत असून मतदानाचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. हे गेल्या 4-5 वर्षातील वाढलेल्या मतदानावरुन दिसून येते. त्यासाठी भारत सरकार निवडणूक आयोग व जिल्हा निवडणुक कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधन, प्रचार मोहिमा राबविल्या जात आहेत. मतदानाची टक्केवारी आणखी वाढविणे आवश्यक आहे. कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविलेल्या मतदार जगजागृती व नोंदणी अभियान प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी, डॉ. मनोहर करांडे, डॉ. संजय नगरकर, नासिर सय्यद, डॉ. सुमन पवार, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिटर माधुरी तनपुरे व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी म्हणाले, राधाबाई काळे महिला महविद्यालयाने याबाबतीत घेतलेला पुढाकार हा खरोखरच कौतुकास्पद आहे. 

उपजिल्हा निवडणुक अधिकारी म्हणाले कि, संपुर्ण जिल्ह्यामध्ये मतदार जागृती अभियान राबविण्यात येत असुन त्या माध्यामातुन विविध शाळा, महाविद्यालय आदींच्या पथ नाट्याव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जागृती अभियान संदर्भात नवमतदारांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. औटी केले. आभार डॉ. संगिता कुलकर्णी यांनी मानले. नोडल अधिकारी डॉ. सहदेव आव्हाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी 150 नव मतदार विद्यार्थींनींची नोंदणी झाली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य - जिल्हाधिकारी Rating: 5 Reviewed By: DNA Live24