Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

कन्हैय्याकुमारच्या नगरच्या सभेला विरोध


अहमदनगर । DNA Live24 - ६ ऑगस्ट रोजी नगरमध्ये कन्हैय्याकुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. देशद्रोही व जातीयवादास उत्तेजन देणार्‍या या कन्हैय्याकुमारच्या सभेस शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने विरोध करत प्रशासनाने सभेवर बंदी घालण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

युवा मोर्चाचे प्रदेश सोशल मिडियाचे सदस्य मल्हार गंधे व शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सीए गौरव गुगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेच्या निषेधार्थ निदर्शने केली.

यावेळी भाजपा  शहर जिल्हा सरचिटणीस  किशोर बोरा, युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, सरचिटणीस सागर कराळे, मिलिंद भालसिंग, सुजित खरमाळे, अ‍ॅड. राहुल रासकर, नितीन जोशी, अज्जू शेख, कैलास गर्जे, वैभव गुगळे, अविनाश साकला, अक्षय कुमार, कैन्हय्या व्यास, संभाजी शेलार, सुरेश पुंड, शशिकांत पालवे, उमेश साठे, अभिषेक शिंदे, बंटी ढापसे, वाहिद कुरेशी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. शहरात सर्व जातीधर्माचे लोक शांततेच्या मार्गाने जीवन जगता आहेत. अशा शहरात जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त कन्हैय्याकुमारची सभा नगरमध्ये झाली, तर शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. कन्हैय्याकुमारच्या वादग्रस्त विधानांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. 

त्यामुळे प्रशासनाने अशा देशद्रोही व्यक्तीमत्व असलेल्या कन्हैय्याकुमारच्या नगरमधील सभेला परवानगी न देता कन्हैय्याकुमारला जिल्हाबंदी करुन नगरमध्ये जमावबंदीचे आदेश द्यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सभा झाल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने कन्हैय्याकुमारला काळे झेंडे दाखवू, असाही इशारा दिला आहे. 

Post Top Ad

Your Ad Spot

Pages