Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

विसापूरच्या बंदीजनांना योग, निसर्गोपचाराचे धडे

अहमदनगर l DNA Live24 - विसापूर येथील खुले कारागृहातील कैद्यांना योग, आयुर्वेद, निसर्गोपचारचे धडे देण्यात आले. सोप्या व सुटसुटीत भाषेत कैद्यांना गुप्तरोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांच्या पुढाकाराने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्‍याने कैद्यांसाठी हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. रुग्णालयाचे जिल्हा पर्यवेक्षक डॉ. सुनील गिरी, समुपदेशक डॉ. राहुल कडूस, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मिश्रा व डॉ. कांबळे यांनी कैद्यांशी संवाद साधत विविध रोगांबद्दल माहिती दिली.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात कैद्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे समाधान करण्यात आले. कैद्यांसाठी पाच दिवसांचे योग व अध्यात्म शिबिर डॉ. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. उपलब्ध सहज नैसर्गिक वनस्पतीद्वारा विविध आजारांचे उपचार याबाबत खूपच नाविन्यपूर्ण माहिती आजच्या कार्यक्रमातून मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेक कैद्यांनी व्यक्त केली.

योगाच्या माध्यमातून बंदिवासात जीवनाला सकारात्मकतेने जगण्याचे मार्गदर्शन मिळाले, याबद्दल सर्व बंदींनी समाधान व्यक्त केले. भोर यांनी जिल्हा रुग्यालय यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी केलेल्या भरीव सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages