728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'मनविसे'कडून १०१ शाडूच्या गणेशमूर्तींचे वितरण


अहमदनगर । DNA Live24 - माणिकनगरचा राजा मित्र मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शाडु मातीच्या १०१ गणेश मुर्ती लकी ड्रॉच्या माध्यमातून वितरीत केल्या. गणेशोत्सवात पर्यावरणाचे प्रदुषण होते. जलप्रदुषण सर्वात मोठी समस्या झाली आहे. यावर एक पाऊल माणिकनगरचा राजा मित्र मंडळ व मनविसेच्या उचलण्यात आले. पर्यावरणाला पुरक व प्रदुषण मुक्त शाडुच्या मातीच्या मुर्ती या गणेशोत्सवात घरामध्ये स्थापन करावे, असे आवाहन मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

प्रदुषण मुक्ती करण्यासाठी एक प्रयत्न गेल्या वर्षीपासुन सुरू केला आहे. १० दिवस मोठ्या भक्ती भावाने आपण गणरायाला पुजत असतो. पण विसर्जनाच्या वेळी गणेश मुर्तींची खुप विटंबना होते. नदी, विहीर, बारवमध्ये विसर्जित केलेल्या पीओपीच्या गणेशमुर्ती पुढच्या वर्षापर्यंत तशाच राहतात. त्यामुळे खरा गणेशोत्सव हा शाडुची गणेश मुर्ती स्थापन करून करावा आणि गणेश विसर्जनाच्या वेळी घरातच एका बादली किंवा भांड्यात गणेश विसर्जन करावे, असे आवाहन वर्मा यांनी केले.

ज्या पाण्यात शाडूच्या मातीच्या गणेशाचे विसर्जन केले, ते पाणी कुंड्यांतील झाडांना वाहुन प्रदुषण रोखण्यासाठी सर्वांनी पाऊल उचलावे, असेही ते म्हणाले. या लकी ड्रॉमध्ये ३८१ घरांनी भाग घेतला. १०१ विजेते घरांमधील सदस्य या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी डाॅ. सुधीर नेमाने यांच्या हस्ते गणेश मुर्ती वितरित करण्यात आल्या. माणिकनगरचा राजा मित्र मंडळ व मनविसेने घेतलेल्या या उपक्रमाचा इतरांनी बोध घेऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, असे ते म्हणाले.

यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, मंडळाचे उपाध्यक्ष संकेत रणसिंग, अक्षय बाफना, निलेश रणसिंग, योगेश गुंड, हरी काकडे, दिपक मगर, सार्थक झिने, मनिष मेढेे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'मनविसे'कडून १०१ शाडूच्या गणेशमूर्तींचे वितरण Rating: 5 Reviewed By: DNA Live24