Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

छायाचित्राच्या चौकटीत विश्‍व दाखवायची शक्तीअहमदनगर । DNA Live24 - चित्र व छायाचित्रात चौकट महत्त्वाची आहे. या चौकटीत विश्‍व दाखवायची शक्ती आहे. वृत्तपत्र छायाचित्रकाराला काम करताना समोरील परिस्थितीचे वास्तववादी चित्रण समाजासमोर मांडायचे असते. या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आंतराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकार अनुराधा ठाकुर यांनी केले. तसेच निसर्ग छायाचित्रण करताना आलेले अनुभव त्यांनी विशद केले.

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार व माध्यमांचे कॅमेरामन प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकुर बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सुधाकर कुर्‍हाडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ठ छायाचित्रकार शेवंतराव गोरे व्यासपिठावर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी करुन, उपस्थितांना छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात विजयसिंह होलम म्हणाले की, छायाचित्रकार हा वृत्तपत्राचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक घटनेचा छायाचित्रकार साक्षीदार असतो. शब्दावरचा विश्‍वास डळमळीत होवू नये, यासाठी छायाचित्र भुमिका बजावत असतो. पुरावा म्हणून छायाचित्राकडे पाहिले जात असून, इतिहास लेखनाचे कार्य छायाचित्र करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

छायाचित्रकाराच्या खांद्याला खांदा लावून, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे कॅमेरामन कार्यकरत असल्याचे सुशील थोरात यांनी सांगितले. दत्ता इंगळे यांनी प्रत्येक सुख, दु:खाची घटना टिपण्यासाठी छायाचित्रकार आघाडीवर असून, तो उपेक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे म्हणाले की, लोकजागृतीच्या चळवळी छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश झोतात आल्या. लोकांची भावना जागृत करण्याचे कार्य छायाचित्र करत असतात. हजारो शब्दांची गरज एक छायाचित्र भागवत असते.

पुर्वी वृत्तपत्रात असलेल्या उत्तम दर्जेदार छायाचित्राची जागा सध्या जाहिरातीने घेतल्याची खंत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली. तसेच प्रेस क्लबच्या वतीने छायाचित्रकारांसाठी घेण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन, छायाचित्रण कलेचा इतिहास उलगडून सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश देशपांडे महाराज यांनी केले. यावेळी पत्रकार सुभाष चिंधे, अशोक झोटींग, सुनिल चोभे, राजेश सटाणकर, वहाब सय्यद उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार राजू शेख, दत्ता इंगळे, सुहास कुलकर्णी, अनिल शहा, बबलू शेख, महेश कांबळे, सचिन शिंदे, राजू खरपुडे, लहू दळवी, मंदार साबळे, श्रीकांत वंगारी, वाजिद शेख, साजिद शेख, अन्वर मनियार, उदय जोशी, माध्यमांचे प्रतिनिधी सुशील थोरात, लैलेश बारगजे, सचिन अग्रवाल, अमीर सय्यद, रोहीत वाळके, उमेर सय्यद, यतीन कांबळे, शब्बीर सय्यद, विक्रम बनकर, विक्रम लोखंडे, शाहीद शेख, जुनेद मन्यार आदिंचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages