728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पाकव्याप्त काश्मिरात अत्याचाराविरोधात आंदोलन


इस्लामाबाद । DNA Live24 - पाकिस्तानकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने पुन्हा एल्गार केला आहे. हा भाग पाकिस्तानचा अधिकृत भाग नाही, अशी घोषणात येथील नेते मिसफर खान यांनी केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात पाकिस्तान शासनाविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. पाकिस्तान या भागात चीनच्या मदतीने आर्थिक कोरिडोर उभा करत आहे. हा भाग आपला असल्याचा दावा करत पाकिस्तानने ही योजना आखली आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाकिस्तानविरोधात येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत मिसफर खान म्हणाले, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरला आपला भाग असल्याचे सांगने सोडून द्यावे. हा भाग कधीही पाकिस्तानचा नव्हता. तसेच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी नेत्यांनी येऊन त्यांचे सुरू असलेले राजकीय नाट्य लवकर थांबवावे. राजकीय पक्षांकडून येथील नागरिकांवर होणारे अन्याय आणि त्यांची आर्थिक लूट थांबविली जावी, असा इशाराही मिसफर खान यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पाकव्याप्त काश्मिरात अत्याचाराविरोधात आंदोलन Rating: 5 Reviewed By: DNA Live24