728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नालेगाव, केडगावात शिवसेनेस खिंडार ! युवकांचा भाजपात प्रवेश


अहमदनगर । DNA Live24 - शहरातील नालेगाव मधील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते शिवाजी अनभुले व केडगाव मधील शिवसेनेचे २५ वर्षापासून काम करणारे युवा कार्यकर्ते प्रतिक बारसे यांनी आज शेकडो युवकांसह आज केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.


भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यास भाजपचे जेष्ठ नेते सुनील रामदासी, उपमहापैर श्रीपाद छिंदम, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी आदींसह भाजपाचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. यावेळी शिवाजी अनभुले व प्रतिक बारसे यांच्या समवेत सुमारे ४०० युवकांनी भाजपात प्रवेश केला. खा.दिलीप गांधी यांनीही सर्वांचे भाजपाचे पंचे घालून स्वागत केले.

यावेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मोठ्या प्रमाणत युवकांनी भाजपात प्रवेश केल्या बद्दल समाधान व्यक्त करत,शुभेच्छा देतांना सांगितले, आज भाजपात युवकांना काम करण्यास मोठी संधी आहे. आज देशात सर्वत्र भाजपाची ताकद वाढत आहे. युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या शेकडो लाभादाई योजना आपापल्या भागातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवाव्यात तसेच आपापल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असा संदेश देत सर्वांना शुभेच्छा देल्या.

यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, महेश तवले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, चेतन जग्गी, भय्या गंधे, नितीन शेलार, श्रीकांत छिंदम, अभय लुणीया, प्रशांत मुथा, तुषार पोटे आदींसह मोठ्या संखेने युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी प्रतिक बारसे व शिवाजी अनभुले यांनी आपापाल्या भागातून मोठे शक्ती प्रदर्शन करून दुचाकी रॅली काढली.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नालेगाव, केडगावात शिवसेनेस खिंडार ! युवकांचा भाजपात प्रवेश Rating: 5 Reviewed By: DNA Live24