728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सत्य बोलायला व मांडायला धाडस लागते - उमेशचंद्र बिरारी


अहमदनगर । DNA Live24 - सत्य बोलायला व मांडण्याकरिता धाडस लागते. ते डावरे यांच्याकडे आहे. सेवेतील कार्यकाळात त्यांनी कर्तव्य निष्ठा बाळगुन प्रामाणिकपणे सेवा केली. आत्मचिंतन केल्यास पांढरपेशी कारभाराला आळा बसून गतिमान प्रशासन निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालघरचे उपजिल्हाधिकारी उमेश बिरारी यांनी केले.

देहरे येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तुकाराम डावरे यांनी महसूल प्रशासनातील प्रदीर्घ सेवेतील निवृत्ती नंतर आत्मचरित्ररूप पुस्तकाची निर्मिती केली. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रविंद्र थोटे, उपजिल्हाधिकारी श्रीनिवास घुगे, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, अरुण लांडगे, सरपंच लक्ष्मण धसाळ, उपसरपंच अनिल करंडे, बंगे महाराज, श्रीहरी महाराज काळे, अ‍ॅड. आर. एम. उंडे, उद्योजक दिपक जरे, विजय लांडगे, सनी लांडगे, अनिल लांडगे, आदी उपस्थित होते.

तहसीलदार रविंद्र बी. थोटे म्हणाले की, महसूल प्रशासनातील सेवानिवृत्त नायब महसीलदार तुकाराम डावरे लिखीत आत्मचिंतन हे पुस्तक महसूल कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक, आध्यात्मिक क्षेत्रासाठी चिंतनीय, विद्यार्थ्यांसाठी अनुकरनीय तर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यासनीय आहे. यावेळी श्रीनिवास महाराज घुगे यांचे प्रवचन झाले.

घुगे महाराज म्हणाले, मानवी जीवनात समस्यांचा ढीग निर्माण झाला आहे. त्यांचा निपटारा करण्याकरीता आत्मचिंतन आवश्यक आहे. चिंतन केल्यास चिंता करावी लागत नाही. तसेच मानवी जन्म हा समाजाचा उत्कर्षासाठी झिजवावा, असे अावाहन त्यांनी केले. तुकाराम डावरे यांनी प्रास्तविक करताना आत्मचिंतन बाबतची भूमिका मांडली. आभार गंगाधर डावरे यांनी मानले. सुहास पाखरे यांनी सुत्रसंचालन केले.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सत्य बोलायला व मांडायला धाडस लागते - उमेशचंद्र बिरारी Rating: 5 Reviewed By: DNA Live24