Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

सिनेरिव्ह्यु : 'इंदू सरकार' - आणीबाणीत नेमकं काय घडलं?

(व्हिडिओ खाली दिलेला आहे)

मुंबई । DNA Live24 - व्यावसायिक चौकटीत राहून एखाद्या क्षेत्रातील ‘पडद्यामागच्या गोष्टी’ नेमकेपणाने दाखविण्याचे खासियत दिग्दर्शक मधुर भांडारकरने आत्मसात केलेली आहे. त्याचे काही सिनेमे सर्वसामान्य प्रेक्षकाला माहित नसलेल्या कार्यक्षेत्रांचे ‘आतले जग’ नक्की दाखवतात. ‘इंदू सरकार’मध्येही आणीबाणीच्या संबंधित काही पडद्याआडच्या गोष्टी पाहायला मिळतील, अशी प्रेक्षक म्हणून अपेक्षा असेल तर ही अपेक्षा फोल ठरवण्याची खबरदारी त्याने घेतलीय. 

आणीबाणीच्या काळात प्रत्यक्ष काय घडलं, याचं वस्तुनिष्ठ चित्रण करण्याचे कष्टही न घेतल्यानं ‘इंदू सरकार’ फारच वरवरचा आणि उथळ वाटतो. आणीबाणीवरील एका ‘पॉलिटिकल सिनेमा’ची, ते पर्व पडद्यावर जिवंत करण्याची अपेक्षा मधुर भांडारकरकडून होती. त्यासाठी आवश्यक चांगली कथा त्यानं निवडली. मात्र, ती योग्य पटकथेच्या आधारे मांडण्याची संधी गमावली आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका जोडप्याची गोष्ट सांगून आणि आणीबाणीतील संदर्भांचा सोयीने वापर करून त्याने ‘इंदू सरकार’ला भांडारकर स्टाइल करून टाकलं. सिनेमाचा रिव्ह्यु नेमका कसा आहे, तेे सिनेस्थेशिया टीमचे सिने समीक्षक विराज मुनोत यांंच्या पुढील व्हिडिओतच प्ले करुन पहा...कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages