728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

देह व्यापारातील महिलांनी बांधलेली राखी संस्मरणीय


अहमदनगर । DNA Live24 - देह व्यापार करणाऱ्या महिला आजही उपेक्षित जीवन जगत आहे. देहविक्री करणाऱ्या महिला समाजात नसल्या तर समाजातील महिलांच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती. समाजाने वाळीत टाकलेल्या देह व्यापार करणाऱ्या महिलांनी बांधलेली राखी नेहमीच स्मरणात राहिल, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा प्रकल्प समन्वयक अमर कळमकर यांनी केले.

स्नेहालय संचालित स्नेहज्योत प्रकल्पाने आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाच्या वेळेस ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे, आदिनाथ खरात, गणेश ठोंबरे, अक्षय वाघमारे, शुभम गोडसे, अमोल म्हेत्रे, गणेश बोराडे, रामेश्वर राऊत, स्नेहालयचे विश्वस्त सुमन त्रिभुवन, प्रकल्प संचालक प्रविण मुत्याल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कळमकर यांनी महिलांना संघटित होऊन सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. महिला प्रतिनिधी सुमन त्रिभुवन यांनी महिलांच्या समस्या व अडचणींबाबत मनोगत व्यक्त केले. देह व्यापारातील महिलांना कोणी आपली बहिण, आई, मावशी, काकू, आजी म्हणत नाही. वेश्यांना व्यवसाय अत्याचार सहन करूनच करावा लागतो. जवळचे नातेवाईक विचारत नाहीत.

कळमकर यांनी मात्र नातेसंबंध नसताना देहव्यापारातील महिलांना बहिण मानले. त्यांच्याकडून राख्या बांधून घेतल्या. त्यामुळे आज या महिलांचे डोळे पाणावले, असे त्रिभुवन म्हणाल्या. प्रास्ताविकात प्रविण मुत्याल यांनी महिलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, आरोग्य केंद्रे, सक्षमीकरण केंद्र आणि संघटनाबाबत माहिती दिली.

आज हा आगळा वेगळा कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने राबविलेल्या उपक्रमाबाबत प्रविण मुत्याल यांनी कौतुक केले. या वेळी देह व्यापार करणाऱ्या महिलांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून आनंद व्यक्त केला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहज्योत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक दिपक बुरम यांनी केले. सर्वांत शेवटी आकाश काळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना पथक, आशा जाधव, सविता करांडे, नीलिमा केदारी आदी प्रयत्नशील होत्या.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: देह व्यापारातील महिलांनी बांधलेली राखी संस्मरणीय Rating: 5 Reviewed By: DNA Live24