Header Ads

 • Breaking News

  बाप रे ! नगरच्या रेल्वे स्टेशनवर बाॅम्ब ?


  अहमदनगर । DNA Live24 - रेल्वे स्थानकावर एका बेवारस पिशवीत बॉम्ब ठेवलेला असल्याचा संदेश पोलिस नियंत्रण कक्षाला मिळतो. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, बॉम्बशोधक, श्वान व दहशतवाद विरोधी पथक, कोतवाली पोलिस, रेल्वे तसेच लोहमार्ग पोलिस रेल्वे स्टेशनची कसून तपासणी करतात. अन् अखेर बेवारस पिशवीत निघालेल्या मोकळ्या खोक्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो.

  पोलिस यंत्रणेची सतर्कता तपासून पाहण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात मॉक ड्रिल करण्यात आले. त्याचाच हा एक भाग असल्याचे सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी स्पष्ट केले. पोलिस नियंत्रण कक्षात आलेल्या फोनवर रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद वस्तू सापडली असून त्यात बॉम्ब असल्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली होती. 

  त्यामुळे सहायक अधीक्षक शिंदे, बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथक, तसेच शहरातील फौजफाटा काही मिनिटांतच रेल्वे स्थानकावर दाखल झाला. रेल्वे स्थानकाच्या काना-कोपऱ्याची कसून तपासणी करण्यात अाली. अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू आढळल्या, तर पोलिस किती सतर्क आहेत, हे तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात आल्याचे सहायक पोलिस अधीक्षक शिंदे यांनी यांनी सांगितले.

  ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  Post Top Ad

  Post Bottom Ad