728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

‘आज की शाम रफी के नाम’ला उत्स्फुर्त दाद !


अहमदनगर । DNA Live24 - ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरतर्फे आयोजित गॅलक्सी ऑर्केस्ट्रा व सुभाष पाटोळे प्रस्तुत ‘आज की शाम रफी के नाम’ या बहारदार गितांचे कार्यक्रमास नगरकरांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत भरभरुन उत्स्फुर्त दाद दिली. निमित्त होते जगप्रसिद्ध गायक स्व. मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथीचे. रसिकांना जुन्या अवीट गाण्यांची मेजवानीय प्रथमच ज्येष्ठ नागरिक संघ,मुकुंदनगरतर्फे देण्यात आली. एन. एम. गार्डन येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात मोहंमद रफी यांचे सुरेल गीत सादर करताना सुभाष पाटोळे यांनी सुरुवातीलच ‘आने से उसके आये बहार.. जाने से उसके जाये बहार’ या गितांनी करुन संपूर्ण सभागृहाला खिळवून ठेवले. टाळ्यांच्या गजरात हा सुरमयी सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर पाटोळे यांनी ‘नसीब में जीसके जो लिखा था.. वो तेरी मेहेफिल में काम आया... क्या हुवा ते वादा... ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा... ऐ मेरी जोहराजबी... तारीफ करु क्या उसकी, टुटे हुवे ख्वाबों ने हमको जो सिखाया है... या एकापेक्षा एक सुरेल गितांनी नगरकरांचे भरपुर दाद मिळविली.

रामकुमार ढुमने यांनी गुलाबी आँखे जो तरी देखी... या सुंदर गितांनी सुरुवात करुन त्याच माहोलला पुढे नेत 'ले गई दिल गुडीयाँ जापान की... बदन पे सितारे लपेटे हुवे... ओ मेरी महेबुबा... यमाँ यमाँ ये खुबसुरत समाँ... बार बार देखो, हजार बार देखो.... आस्मान से आया फरिशता प्यार का सबक सिखलाने... अशा चुलबुले गितांनी सभागृह मंत्रमुग्ध करुन टाकले. इकबाल बागवान यांनी दर्दे दिल दर्दे जिगर, दिल में जगाया आपने... मेरी महुवा... गम उठाने के लिये मै तो जिये जाऊगां या गीतांनी सभागृहाची मने जिंकली.

आंग्रे यांनी गुढीया जपान की.. मवाँ सारखे गित सादर करुन सभागृहाची वाऽह वाह मिळविली. शेख मुमताज यांनी ‘ये समाँ है प्यार का.. जिंदगी प्यार का गित है.. बेखुदी में सनम उठ गये जो कदम... वादा करले साजना.. तुने ओ रंगीले कैसा जादू किया.. ये मेरा दिल प्यार का दिवाना.... अशा सुंदर गाण्यांची रसिकांची दाद मिळविली. या व्यतिरिक्त अ‍ॅड.श्रीपाद कुलकर्णी, हनिफ जरिवाला, स्वामी सिंगर यांनी अप्रतिम गिते सादर करुन साथ संगत केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहंमद रफी यांना अभिवादन करुन ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वात ज्येष्ठ सभासद इस्माईल पठाण, हाजी बिलाल अहमद व बशीर पठाण यांनी दीपप्रज्वलन केले. प्रास्तविक करताना शेख रऊफ बिल्डर यांनी सर्व कार्याचा आढावा घेतला. आभार संघाचे अध्यक्ष शाह निजाम यांनी मानले. सूत्रसंचालन ललिता उबाळे यांनी केेले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी शेख फकिर मोहंमद, हनिफ जरीवाला, शेख सर, अ‍ॅड. मौलवी हनिफ, शेख सईद, हबीब पेंटर, शेख हारुन, शेख आरिफ, फिरोज जहागिरदार, शेख सलिम, शेख रसिद व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: ‘आज की शाम रफी के नाम’ला उत्स्फुर्त दाद ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24