Header Ads

  • Breaking News

    मुख्यमंत्र्यांनी दिल आश्वासन; मराठा मोर्चाचा समारोप !


    मुंबई । DNA Live24 - ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला. भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मराठा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप झाला.

    क्रांतीदिनाचं औचित्य साधून राजधानी मुंबईत आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा, दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं.

    विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री - मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल.

    “छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसींप्रमाणे आता मराठा समाजासाठीही आणली जाईल. तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. यापूर्वी फक्त 35 अभ्यासक्रमांसाठीच मराठा समाजाला सवलत होती. तसंच आण्णासाहेब पाटील महामंडळांचे तीन लाख तरुण स्किल ट्रेनिंग देतील. तर दहा लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार असून यासाठी पाच कोटी दिले जातील,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad