728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

रविवारी नगरमध्ये 'निर्भय मॉर्निंग वॉक' !


अहमदनगर । DNA Live24 - शहरामध्ये रविवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह ते शाहिद भगतसिंग पुतळ्यापर्यंत 'निर्भय मॉर्निंग वॉक' चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येला २० ऑगस्टला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येला येत्या २० फेब्रुवारीला रोजी २ वर्षे पूर्ण होतील. तरीही अद्यापपर्यंत या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ या 'निर्भय मॉर्निंग वॉक' चे आयोजन केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी आयुष्यभर सनदशीर मार्गाने व लोकशाही पध्दतीने विचारांची लढाई लढली, परंतु सनातन्यांनी बंदुकीच्या गोळ्यांनी या लढाईला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा अभिव्यक्ती व व्यक्ति स्वातंत्र्यावरील मोठा आघात झाला. परंतु बंदुकीच्या जोरावर विचार कधीही मरत नसतो. त्यामुळे या निर्घृण हत्येनंतर अनेक कार्यकर्ते अधिक जोमाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत.

निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यासाठी शहीद भगतसिंग पुतळ्याजवळ सर्व कार्यकर्ते विचारांची लढाई पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करून शपथ घेणार आहेत. यामध्ये कॉ. बन्सी सातपुते, सुभाष लांडे, प्रमोद गारुळे, रविंद्र सातपुते, स्मिता पानसरे, नीलिमा बंडेलु, मेहबूब सय्यद, बहिरनाथ वाकळे, सुनील गोसावी, भगवान राऊत, शिवाजी नाईकवाडी, अनंत लोखंडे, अशोक गायकवाड, अविनाश घुले, अतुल महारनवर, अर्षद शेख, राजु शेख, सालोमन गायकवाड, अनिल भोसले, विठ्ठल बुलबुले, संध्या मेढे, यशवंत तोडमल, संजय खामकर आदी सहभागी होणार आहेत.

हा मॉर्निंग वॉक रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह येथून सुरू होईल. नंतर प्रोफेसर कॉलनी चौक - प्रेमदान चौक - झोपडी कॅन्टीन मार्गे भगतसिंग पुतळ्या पर्यंत हा मॉर्निंग वॉक जाईल. तरी नागरिकांनी या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संघटना व संयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: रविवारी नगरमध्ये 'निर्भय मॉर्निंग वॉक' ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24