Header Ads

 • Breaking News

  यशस्वी पोलिसांचा एसपींकडून सन्मान !


  अहमदनगर । DNA Live24 - पोलिस दलातील विविध परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलिसांचा नुकताच पेलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सत्कार करुन कौतुक केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांचे प्रमुख उपस्थिती होती. भविष्यातील कारकिर्दीसाठी पोलिस अधीक्षकांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंकुश इंगळे यांची वर्ध्याला जात पडताळणी विभागात उपअधीक्षकपदी, अनिलकुमार श्िांदे यांची आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस उपअधीक्षकपदी बढती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ बाळू सिद (श्रीगोंदा), अजित तुकाराम चिंतले (जामखेड), इसामुद्दिन नासीर पठाण (तोफखाना), विकास सुखदेव देवरे (शिर्डी), विनय गाेविंद सरवदे (संगमनेर), भरत दत्तात्रय जाधव (राजूर) यांना पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली.

  तर खात्याअंतर्गत परीक्षा देऊन फौजदार म्हणून उत्तीर्ण झालेल्या अकरा पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परशुराम बाबासाहेब दळवी, सागर भाऊसाहेब काळे, चांगदेव बबन हंडाळ, शंकर अर्जुन शिरसाठ, विजय किसन साठे, भानुदास भाऊसाहेब नऱ्हे, बाबासाहेब किसन भवर, अमोल नारायण गर्जे, शहाबाज झुबेर शेख, देविदास रोहिदास साळवे, संजयकुमार पंढरीनाथ नाईक यांचा समावेश आहे. या सर्वांचा पोलिस अधीक्षकांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

  Post Top Ad

  Post Bottom Ad