Header Ads

 • Breaking News

  अयोध्येतील राम मंदिराचा तिढा सुटणार ? ११ ऑगस्टपासून सुनावणी !


  नवी दिल्ली । DNA Live24 - अयोध्या राम मंदिर तिढा सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्रिसदस्यीय खंडपीठाची स्थापना केली आहे. अलाहबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. हे खंडपीठ 11 ऑगस्टला राम मंदिरासंबंधीच्या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे.

  न्या. दीपक मिश्रा या खंडपीठाचे अध्यक्ष असून न्या. अशोक भूषण आणि न्या. एस अब्दुल नझीर या खंडपीठाचे सदस्य आहेत. हे खंडपीठ अयोध्येतल्या राम मंदिर खटल्यावर अंतिम निर्णय देईल.

  अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणावर 2010 साली निर्णय दिला होता. त्या निर्णयात राम मंदिर निर्माण समिती, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा या तिघांनाही वादग्रस्त जमिनीचा प्रत्येकी 33.33% हिस्सा मिळाला होता.

  त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. 21 जुलैला न्यायाधीश जगदीश सिंग खेहर यांच्या पीठाने या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी एका खंडपीठाची घोषणा केली होती. त्या निर्णयानुसार या खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad