Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

दरोडेखोराकडून दीड लाखाचे सोने हस्तगत


अहमदनगर । DNA Live24 - स्वस्तात ड्रायफ्रुट देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या कुख्यात दरोडेखोराकडून लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही कामगिरी केली. राहुल निवाश्या भोसले असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून यापूर्वीही काही दागिने हस्तगत केलेले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील ड्रायफ्रुट्सचे व्यापारी निलेश सुभाष डुमरे (रा. तळेगाव दाभाडे) मे महिन्यात राहुल भोसले त्याच्या साथीदारांनी स्वस्तात ड्रायफ्रुटस् देण्याचे आमिष दाखवले. त्यांना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात बोलावून जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळची रोकड सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी डुमरे यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी राहुल भोसले त्याच्या साथीदारांना अटक केली होती. 

राहुल भोसले (रा. सारोळा कासार) याच्याविरुद्ध अशाच स्वरूपाचे आणखी गुन्ह्यांची नोंद आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय किशोरकुमार परदेशी, फौजदार महेश क्षीरसागर, नेरकर, पोलिस नाईक रवींद्र अौटी, साबिर शेख, आनंद सत्रे, विनोद पवार, संदीप जाधव, लता पुरणे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपीकडून लाख ३० हजार रुपयांचे सोने हस्तगत केले. सोन्याच्या चार अंगठ्या, एक साखळी जप्त केली. त्याच्याकडून यापूर्वीही दुसऱ्या गुन्ह्यात सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेेत.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages