728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'त्यांनी'ही अनुभवली रणगाड्याची सफर


अहमदनगर । DNA Live24 - महिलांनी एकत्र येवून सामाजिक कार्याच्या भावनेने स्थापन केलेल्या सेवाप्रित सोशल फाऊंडेशनच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्‍वभुमीवर नगर सोलापूर रोड येथील रणगाडा संग्रहालयाची सफर घडविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत होवून, सैनिकांविषयी आपुलकी व प्रेरणा निर्माण होण्यासाठी तसेच भारतीय सेनेचे लष्करी सामर्थ्य जाणून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शैक्षणिक सहलीत पंचशील विद्या मंदिरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर विजय मिळवून आनलेले रणगाडे, अद्यावत भारतीय रणगाडे व युध्दात वापरण्यात येणार्‍या शसास्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. देशभक्तीच्या गीतांवर हिरवळीवर बागडून विद्यार्थ्यांनी धमाल केली. या सहलीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, गीता नय्यर, रीणा जगताप, मेघा लाहोटी, सत्तू वधवा, सपना ग्रोवर, स्वीटी तलवार, रजिंदर जग्गी, अंजू बतेजा, निशा आरोरा, दिप नय्यर आदि उपस्थित होते. जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची प्रगती होणार आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत केल्यास सशक्त भारत निर्मितीचे स्वप्न साकार होणार आहे.

विद्यार्थ्यांना भारतीय लष्करी सामर्थ्य समजून प्रेरणा मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. सीमा गुलाटी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर ग्रुपने मिष्टान्न भोजनवाटप करण्यात आले. 125 महिलांनी एकत्रित येवून समाजकार्याच्या उद्देशाने या फाऊंडेशनची स्थापना केली. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात या फाऊंडेशनचे कार्य चालू असून, गीता नय्यर यांच्या संकल्पनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'त्यांनी'ही अनुभवली रणगाड्याची सफर Rating: 5 Reviewed By: DNA Live24