728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अविनाश कराळे पाटील यांना 'शिवशंभो कलारत्न' पुरस्कार


अहमदनगर । DNA Live24 - श्री शिवशंभो प्रतिष्ठान व आष्टी तालुका मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय 'शिवशंभो कलारत्न' पुरस्कार नगर येथील नाट्य अभिनेते व निवेदक अविनाश कराळे पाटील यांना जाहीर झाला असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे स्वागताध्यक्ष तथा पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सदस्य बाळासाहेब पवार यांनी सांगितले आहे. 

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १० सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता नगर-पुणे रोडवरील ओम गार्डन मंगल कार्यालय येथे होईल. मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. शिवाजी (आण्णा) कराळे पाटील यांनी दिली आहे.

अविनाश कराळे पाटील हे गेल्या १७ वर्षांपासून रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समन्वयक, संयोजन समिती सदस्य आणि परीक्षक म्हणून कार्य करीत आहेत. आजवरच्या नाट्यप्रवासात कराळे पाटील यांनी विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्यस्तरीय मराठी व हिन्दी राज्य नाट्य स्पर्धा, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी नाट्य स्पर्धा, झी गौरव मराठी नाट्य स्पर्धा, व्यावसायिक नाटक या माध्यमातून जवळपास ३५० हून अधिक प्रयोग केले.

अभिनयासोबतच तांत्रिक बाबींचीही अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. यासोबत अनेक लघुपट व मराठी चित्रपटातूनही त्यांनी काम केले आहे. काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या 'घुमा' या मराठी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली आहे. 

अविनाश कराळे पाटील यांनी गेल्या १० वर्षांपासून रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असणाऱ्या  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर जिल्हा शाखेचे कार्यकारिणी सदस्य, माजी कोषाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही काम पाहिले आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आदी कार्यक्रमांचे निवेदक, सूत्रसंचालक व वृत्तनिवेदक म्हणून ते नगरकरांना परिचित आहेत. 

अहमदनगर येथे पार पडलेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय पथनाट्य, एकपात्री अभिनय स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृव स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धामध्येही त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत प्रथम क्रमांकासह अनेक बक्षिसे त्यांनी मिळविली आहेत. 

या निवडीबद्दल येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रंगकर्मी प्रतिष्ठान, संघर्ष युवा प्रतिष्ठान, जिप्सी थिएटर्स,  सप्तरंग थिएटर्स, सवंगडी एकसंघ आदी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व नाट्यकर्मीं तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अविनाश कराळे पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अविनाश कराळे पाटील यांना 'शिवशंभो कलारत्न' पुरस्कार Rating: 5 Reviewed By: DNA Live24