Header Ads

 • Breaking News

  चिंतेने तणाव वाढतो, चिंतनाने मार्ग निघतो - डॉ. सुधा कांकरिया


  अहमदनगर । DNA Live24 - सकारात्मक दृष्टीकोनाने आनंदी जीवन जगता येते. प्रत्येक गोष्टींच्या परिणामांचा विचार केल्यास तणाव अधिक वाढतो. चिंतेने तणाव वाढते तर चिंतणाने मार्ग निघतो. प्रत्येक कामात आत्मविश्‍वास वाढविल्यास तणाव कमी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. रक्षाबंधन निमित्त प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.

  यामध्ये महिलांसाठी विविध बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. डॉ. सुधा कांकरीया यांनी तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश चोपडा, ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, शोभा मेहेर, मधू बोरा, छाया रजपूत, डॉ. मंगल सुपेकर, निर्मला मालपाणी, चंद्रकला सुरपुरिया, सरस पितळे, अलका मुनोत, दिलीप परदेशी, कुसूमसिंग, सिमा ढोकणे, शशीकला बोरा आदी उपस्थित होते.

  प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. दिपा मालू यांनी विविध बौध्दिक स्पर्धा घेतल्या. स्पर्धेतील विजेत्या महिलांना राजेश चोपडा व डॉ. कांकरिया यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. रक्षाबंधन निमित्त उपस्थित महिलांना टाटा टी गोल्डच्या वतीने चहापत्ती पावडर व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरी जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार निर्मला मालपाणी यांनी मानले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad