Header Ads

 • Breaking News

  कोपर्डी खटला : सुप्रिम कोर्टाने फेटाळली आरोपी भवाळची याचिका


  नगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह इतर ५ जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावली. हायकोर्टाने मंजुरी दिलेले आरोपी पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण आजारी असल्याने न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची साक्ष ३० ऑगस्टला नोंदवली जाणार आहे.

  आरोपी संतोष भवाळतर्फे बचावाचे साक्षीदार म्हणून अॅड. उज्ज्वल निकम, रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, उदय निरगुडकर, फॉरेन्सिक सायन्स लॅबचे डायरेक्टर, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांना साक्षीदार म्हणून तपासण्याची मागणी केली होती. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आरोपीच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, विजयालक्ष्मी खोपडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले.

  औरंगाबाद खंडपीठाने केवळ रविंद्र चव्हाण यांनाच साक्षीदार म्हणून तपासण्यास परवानगी दिली. इतरांना बचाव पक्षाचे साक्षीदार करण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने केवळ एकाच साक्षीदाराची उलट तपासणी करण्याची परवानगी दिली, इतर पाच साक्षीदारांचीही साक्ष नोंदवून घेतली जावी, अशी मागणी त्याच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

  -----------------------
  वाचा यापूर्वीच्या बातम्या

  मराठा मोर्चाच्या मागण्यांच निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त
  फोटोतून पहा मुंबईचा मराठा क्रांती मोर्चा !
  कोपर्डी खटला : आरोपींचा साक्षीदार १७ ला तपासणार
  काेपर्डी खटला : खंडपीठात अपिलासाठी आरोपीला पुन्हा मुदत
  कोपर्डी खटला : मुख्यमंत्र्यांना साक्षीदार करण्याची मागणी आरोपीच्या वकिलांकडून मागे
  कोपर्डी खटला - दबावामुळे नव्हे, तपासात नाव आल्यामुळेच भैलुमेला अटक
  कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला

  ------------------------

  अारोपी पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण गुरुवारी सुनावणीला गैरहजर होते. आजारी असल्यामुळे डॉक्टरांनी आणखी दहा दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. तसा अर्ज त्यांच्या वतीने अॅड. ए. एच. अहिरे यांनी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला. त्यावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांची साक्ष घेण्याबद्दल विचारणा केली. मात्र, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नकार दर्शविला. त्यामुळे आता ३० आॅगस्टला चव्हाण यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

  ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  Post Top Ad

  Post Bottom Ad