728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जवखेडे हत्याकांड खटल्यात तीन पंचांच्या साक्षी


अहमदनगर । DNA Live24 - पाथर्डी तालुक्यातील बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात बुधवारी एका पंचाची साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश माळी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव हे काम पहात आहेत. हत्याकांडानंतर पंधरा दिवसांनी काही संशयितांची घरझडती घेण्यात आली, त्यावेळी पंचनामे करताना किशोर नामदेव भोसले हे पंच उपस्थित होते.

सकाळच्या सत्रामध्ये अॅड. उमेशचंद्र यादव यांनी भोसले यांची सरतपासणी घेतली. आपल्यासमोर भाऊसाहेब जाधव, भीवसेन जाधव, संतोष जाधव लक्ष्मण वाघ आणि दगडू पठाण यांच्या घरांची झडती पाेलिसांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. पंचनाम्याच्या वेळा, पाचही व्यक्तींच्या घराची वर्णने, झडतीमध्ये आढळलेल्या बाबींचा तपशील त्यांनी अचूकपणे कथन केला. दुपारच्या सत्रात आरोपींच्या वतीने अॅड. सुनिल मगरे यांनी उलटतपासणी घेतली.

या खटल्यात मंगळवारी महादेव मरकड व प्रशांत सरगळ या दोन पंचांची सरतपासणी घेण्यात आली. दोघांची उलटतपासणीही मंगळवारीच पूर्ण झाली. या खटल्यात आतापर्यंत ९ जणांच्या साक्षी नोंदवून झाल्या आहेत. विशेष सरकारी वकील यादव यांनी मंगळवारी फारसा संबंध नसलेले ४ साक्षीदार वगळण्याबाबत न्यायालयात अर्ज दिला. बुधवारच्या सुनावणीला पंचांची उलटतपासणी घेताना आरोपीचे वकील मगरे यांनी आक्षेपार्ह पद्धतीने प्रश्न विचारले. त्यामुळे मगरे यांना न्यायालयाने दोन वेळा तंबी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जवखेडे हत्याकांड खटल्यात तीन पंचांच्या साक्षी Rating: 5 Reviewed By: DNA Live24