728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

लष्करे टोळीशी संबंधित दोघे पिस्तुलासह जेरबंद


अहमदनगर । DNA Live24 - गावठी पिस्तुलविक्री करायला आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकातील पोलिसांसह नगर तालुका पोलिसांनी चिचोंडी पाटील (ता. नगर) बसस्थानकावर ही कामगिरी केली. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही युवकांचे लष्करे टोळीशी संबंध असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

चिचोंडी पाटीलच्या बसस्थानकावर दोन युवक गावठी पिस्तुलाची विक्री करायला येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरक्त अधीक्षक पाटील यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू वाघ, पोलिस नाईक भरत डंगोरे, अभय कदम, गणेश डहाळे, सुरेश माळी यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय किशोरकुमार परदेशी, कॉन्स्टेबल आनंद सत्रे यांनी सापळा रचला.

आशिफ रफिक शेख (वय १९, रा. गुजरगल्ली, चिचोंडी पाटील) व भूषण अरुण दवणे (वय २३, रा. साईनगर, चिचोंडी पाटील) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसंानी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४५ हजार रुपये किंमतीचे स्टील बॉडीचे गावठी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे सापडली. त्यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, या दोघांचेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेवाशातील कुख्यात लष्करे टोळीशी संबंध असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगर तालुका पोलिस आता त्यांची अधिक कसून चौकशी करीत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: लष्करे टोळीशी संबंधित दोघे पिस्तुलासह जेरबंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24