728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे 'समाजस्वास्थ्य' यशस्वी


अहमदनगर । DNA Live24 - कॉ. गोविंद पानसरे स्मृती ट्रस्ट च्या मदतीसाठी येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित 'समाजस्वास्थ्य' या सामाजिक प्रबोधनपर नाटकास शहर व जिल्ह्यातील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला, असे प्रतिपादन या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे यांनी केले.

रविवारी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या 'समाजस्वास्थ्य' या नाट्य प्रयोगानंतर आयोजित समारोप व सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संयोजक अॅड. कॉ. सुभाष लांडे, अॅड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बाबा आरगडे, प्राचार्य शिवाजी देवढे, कॉ. स्मिता पानसरे, बेबी लांडे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ. सुधीर टोकेकर, ज्ञानदेव पांडुळे, रवींद्र सातपुते, अंकुश कानडे, कॉ. बहिरनाथ वाकळे, संजय खामकर, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

संयोजकांच्या वतीने नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, कलावंत राजश्री सावंत, धनंजय सरदेशपांडे, अभय जबडे, अजित साबळे, रणजित मोहिते, आशिष वझे, कृतार्थ शेवंगावकर, करण कांबळे, संतोष माळी, नीरज पांचाळ, अनुप सातपुते, प्रशांत कांबळे, ओंकार शिंदे, राजस कोठावळे, रेखा ठाकूर आदी कलावंतास पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी र. धो. कर्वे यांनी आपल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाद्वारे जे समाज प्रबोधन केले.

कर्वे यांच्या समाजप्रबोधनावरच अजित दळवी यांनी लिहिलेल्या दोन अंकी नाटकात स्वतः अतुल पेठे यांनी दिग्दर्शनाबरोबरच र. धो. कर्वेची भूमिका साकारली आहे. तर राजश्री सावंत- वाड यांनी र. धों. च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. कॉ. गोविंद पानसरे स्मृती ट्रस्टच्या वतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. या नाट्यप्रयोगाच्या यशस्वितेसाठी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुनिल गोसावी, भगवान राऊत, शर्मिला गोसावी, कॉ. बहिरनाथ वाकळे, राजेंद्र पवार, हर्षल आगळे यांनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे 'समाजस्वास्थ्य' यशस्वी Rating: 5 Reviewed By: DNA Live24