Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

सायबर क्राईम : युवतीचे लग्न मोडणारा अटकेत


अहमदनगर । DNA Live24 - उच्चशिक्षित युवतीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन तिचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकाला सायबर पोलिसांनी अटक केले. वैभव रमेश लवांडे (रा. मांडवे, ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. युवतीच्या नावाने तिच्या भावी पतीसोबत चॅटिंग करुन लवांडेने तिचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पाथर्डी पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद असून लवांडेला अटक करण्यात आली.

तिसगाव (ता. पाथर्डी) येथील एका युवतीचे लग्न ठरलेले होते. लग्नाची बोलणी होऊन ऑगस्ट महिन्यात साखरपुडा होता. पण, जुलै महिन्यात तिच्या नावाच्या फेक फेसबुक अकाऊंटवरुन तिच्या भावी पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. त्याने ती स्वीकारली. नंतर त्या अकाऊंटवरुन तिच्या पतीला युवकाने गैरसमज निर्माण करणारे संदेश पाठवले. त्यामुळे युवतीचे लग्न मोडायची वेळ आली. युवतीने पोलिसांत तक्रार केली.

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार, फौजदार पी. डी. कोळी, किर्ती पाटील, पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड यांनी तपास केला. फेक फेसबुक अकाऊंट वैभव लवांडेने तयार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. बनावट अकाऊंटचा खरा प्रकार समोर आल्याने युवतीचे लग्न वाचले. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना धन्यवाद दिले.

सायबर पोलिसांचे लक्ष - कोणत्याही महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करु नका. मुलींनीही अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारु नयेत. अनोळखी व्यक्तींना फेसबुक रिक्वेस्ट पाठवू नये. आपले वैयक्तिक फोटो फेसबुकवर पोस्ट करु नयेत. किंवा फोटो पोस्ट केल्यास प्रायव्हेट सिक्युरिटी सेटिंग अॅक्टिव्हेट करावी. जेणेकरुन आपल्या फोटोंचा गैरवापर होणार नाही. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे. - सुनिल पवार, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Post Top Ad

Your Ad Spot

Pages